Awaj India
Register
Breaking : bolt
आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 'समुपदेशक' नेमाविद्यार्थ्यां साठी मोफत शिक्षण डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांना* *स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग*हनुमान पतसंस्थेची भरारी; १.८५ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन बळवंत पाटील मास्तरआरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज - ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन*जैवतंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाभिमुख दृष्टीकोन आवश्यक – डॉ. एस. आर. यादव* *कोडोली (ता. पन्हाळा) येथे प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी संयुक्त धडक कारवाई*डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा* *ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीसोबत सामंजस्य करार*जिल्हास्तरीय युवा पुरस्कार; ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ* कुडीत्रे येथे ‘तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा’ उत्साहात संपन्न*

जाहिरात

 

विद्यार्थ्यां साठी मोफत शिक्षण

schedule23 Apr 26 person by visibility 52 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : “शिक्षणाशिवाय आपला पर्याय नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,” असा विचार मांडणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गरिब व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, विचारमाळे (कोल्हापूर) येथे बुधवार, दि. 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता ही कार्यशाळा होणार आहे.
या कार्यशाळेत अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार असून इयत्ता सहावी ते दहावी तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक संधींची माहिती दिली जाणार आहे. विविध शिष्यवृत्ती योजना, मोफत वसतिगृह सुविधा तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी 9765024443 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.
ही कार्यशाळा कृती बहुउद्देशीय फौंडेशन तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes