Awaj India
Register
Breaking : bolt
हुपरीत ‘छत्रपती ग्रुप ब्लड सेंटर’चे उद्घाटन; रक्तासाठीची नागरिकांची धावपळ थांबणारNEET परीक्षेतील घोटाळ्याचा निषेध; कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन देणारग्रामीण विकासासाठी अध्यक्षा शिल्पा खोत यांचा धडाकेबाज तालुका दौरा; गडहिंग्लजमध्ये नागरिकांच्या समस्यांवर प्रशासन तत्परकोल्हापूरच्या पाच तालुक्यांत आता फुलणार ‘पांढरे सोने’; ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेसाठी १० मे पासून अर्ज प्रक्रिया सुरूविनाअनुदानित शाळांना कोल्हापूर खंडपीठाचा मोठा दिलासा; जाचक शासन निर्णय रद्द!कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा* *‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान*कोल्हापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे 'कर्जमाफी आंदोलन'; विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडककोल्हापुरात महिला सक्षमीकरणासाठी 'स्वराज्य महिला मंच' सज्ज; आज कार्यालयाचे भव्य उद्घाटनडॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विशेष शोप्रत्येक जिल्ह्यात ईएसआयसी रुग्णालय उभारणार - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर*

जाहिरात

 

कोल्हापुरात महिला सक्षमीकरणासाठी 'स्वराज्य महिला मंच' सज्ज; आज कार्यालयाचे भव्य उद्घाटन

schedule14 May 26 person by visibility 22 categoryराजकीय

कोल्हापूर: आवाज इंडिया प्रतिनिधी 

महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी कोल्हापुरात 'स्वराज्य महिला मंच' या नवीन कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. या कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ आज, गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मान्यवरांची उपस्थिती

​या कार्यालयाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. रुपाराणी निकम आणि गोकुळच्या संचालिका मा. सौ. शौमिका महाडिक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रमुख मान्यवर आणि स्वराज्य महिला मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

​स्वराज्य महिला मंचच्या अध्यक्षा डॉ. सौ. नेहा अभय तेंडुलकर (नगरसेविका) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. या उद्घाटन सोहळ्यास जास्तीत जास्त महिलांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागतोत्सुक डॉ. सौ. नेहा तेंडुलकर आणि श्री. अभय शशिकांत तेंडुलकर (विशेष कार्यकारी अधिकारी) यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes