डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा विशेष शो
schedule14 May 26 person by visibility 44 categoryराजकीय
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुले तसेच वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रयोदी सोशल अँड कल्चरल फाऊंडेशन, वाढदिवस समिती आणि संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान विचारे माळ मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १४ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता डीवायपी येथील पीव्हीआरमध्ये हा विशेष शो पार पडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, इतिहास आणि प्रेरणादायी कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बालकल्याण संकुलातील मुले आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांना या माध्यमातून चित्रपटाचा आनंद घेता येणार असून त्यांच्यासाठी हा उपक्रम विशेष ठरणार आहे.
डॉ. प्रवीण कोडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदाही सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.