Awaj India
Register
Breaking : bolt
ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्ध: सभापती श्रद्धा गायकवाड​निपाणी-गारगोटी रोडवर ३.६३ लाखांच्या मुद्देमालासह गुटखा आणि कार जप्त“एक पाऊल प्रगतीकडे, जिल्हा परिषद अध्यक्षांचा दौरा तालुक्याकडे!”शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी साताप्पा विष्णू पाटील उपाध्यक्षपदी गजानन सखाराम कांबळे चुये येथील एस. एच. पी. हायस्कूलचा दहावीचा निकाल ९८% टक्के; सई पाटील विद्यालयात प्रथमपावसाळा १५ दिवसांवर तरीही नाले उपसा कागदावरमुरगुडमध्ये वृद्धाला लुटणारी इराणी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईराधानगरीतील फालेवाडा येथील खून प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाईकॉम्रेड गोविंद पानसरे विचार संमेलन कोल्हापुरात डॉ. भारत पाटणकर उद्घाटक तर डॉ. कपिल राजहंस संमेलनाध्यक्षजिद्दीला मिळाले यश! २०२० पासूनच्या संघर्षानंतर रूथ सकटे पोलीस भरतीत चमकली

जाहिरात

 

चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयी

schedule03 Apr 25 person by visibility 1329 categoryक्रीडा

"चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ विजयी
 
कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत "चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ व श्री शिवाजी तरुण मंडळ यांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत, पुढील फेरीत प्रवेश केला.
 
सामन्याची सुरुवात माजी उपमहापौर विक्रम जरग, शिवाजी तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल इंगवले, विशाल बोंगाळे, शिवतेज खराडे, अजय खापणे, दुर्गेश लिंग्रस, काकासाहेब जाधव, संजय कुराडे, किशोर साठे, संदीप साठे, लालासाहेब गायकवाड, संजय पडवळे, अनिल सावंत, शेखर पवार, संपत मंडलिक, महेश निकम, बाळासाहेब भोसले, रोहित मोरे, अभिजीत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.
 
आजच्या दिवसातील पहिला सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात खंडोबा तालीम मंडळने संध्यामठचा ३-२ असा पराभव केला. पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून खंडोबा संघाच्या संकेत मेढेची निवड झाली. 
 
आजच्या दिवसातील दुसरा सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्लब यांच्यात खेळला गेला. या सामन्यात संघाचा श्री शिवाजी तरुण मंडळांने फुलेवाडी फुटबॉल क्लबचा ४-०ने पराभव करून, पुढील फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून श्री शिवाजी तरुण मंडळाच्या बसंता सिंगची निवड झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes