Awaj India
Register
Breaking : bolt
तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”*पहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार; शिक्षक नेते दादासो लाड यांची स्पष्टोक्ती*शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करणारच: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांची स्पष्ट भूमिका*सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन* *आदर्श डॉक्टर बना- डॉ. संजय डी. पाटील*कराडमध्ये पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ; कौस्तुभ गावडे यांना वाढता पाठिंबा*करवीर तालुक्यातील ठरावधारकांचा छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला भक्कम पाठिंबा*महायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल* सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन* *आदर्श डॉक्टर बना- डॉ. संजय डी. पाटील*शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी मी कटिबद्ध आहे- शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेगारगोटी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*

जाहिरात

 

*डॉ डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक*

schedule27 Feb 26 person by visibility 1084 categoryक्रीडा

कसबा बावडा : येथील डॉ डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकच्या मुलांच्या संघाने पदविका विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. सावंतवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यातील अकरा संघ सहभागी झाले होते.
या विजयी संघात अथर्व शिंदे ,हेत छाभैय्या ,तनिष्क यादव ,मितेश पटेल ,मेहुल पटेल यांचा समावेश आहे.
 
डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के.गुप्ता, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी , रजिस्ट्रार महेश रेणके जिमखाना विभागप्रमुख अक्षय करपे, प्रा. सुरज जाधव यांच्या उपस्थितीत या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
 
इंटर इंजिनीरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत या स्पर्धा झाल्या. डॉ डी. वाय. पाटील पॉलीटेक्निक संघाने शरद पॉलीटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक रत्नागिरी आणि अंतिम सामन्यात संजय घोडावत पॉलीटेक्निक या संघावर विजय मिळवले. विजेता डी. वाय.पाटील संघ संजीवनी केबीपी पॉलीटेक्निक कोपरगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
 
*फोटो ओळी*: विभागीय बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्या संघातील खेळाडूंचा सत्कार करताना डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील .सोबत विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के.गुप्ता, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी , रजिस्ट्रार महेश रेणके जिमखाना विभागप्रमुख अक्षय करपे, प्रा. सुरज जाधव.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes