कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत एकदिवसीय धरणे आंदोलन
schedule22 Nov 26 person by visibility 44 categoryराजकीय
; कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
कोल्हापूर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक २५ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच विविध विभागांतील कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य शाखा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनामध्ये प्रामुख्याने पदोन्नतीमधील आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करणे, राज्यातील अनुशेष भरती रिक्त पदे तात्काळ भरणे जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच कंत्राटीकरणाची पद्धत रद्द करून नियमित पदभरती करणे, या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक प्रश्न, सामाजिक न्यायाचे धोरण, आरक्षणाचे संरक्षण आणि कर्मचाऱ्यांचे आर्थिक व सामाजिक हित या बाबींचा विचार करून शासनाने या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी महासंघाची भूमिका आहे.
या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी राज्य संघटक सचिव श्री. सनी माने यांनी विशेष आवाहन केले असून, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कर्मचारी बांधवांनी संघटित होऊन आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. विनायक कांबळे कार्याध्यक्ष श्री सुरेश सोनगेकर उपाध्यक्ष श्री अलंकार पेडणेकर कार्याध्यक्षा श्रीमती अंजना माने, सचिव श्री. संतोष गायकवाड, सहसचिव श्री. जावेद सय्यद, प्रसिद्धीप्रमुख श्री. नंदकुमार वर्धन यांनी केले आहे.
यावेळी , उपाध्यक्ष श्री. कृष्णात चौगुले (दिव्यांग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य), श्री. गजानन सावंत (कास्ट्राईब वाहनचालक संघटना), श्री. विशाल असोदे (उपाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य), श्री. असिफ (अध्यक्ष, भूमी अभिलेख कास्ट्राईब कर्मचारी संघटना) व श्री. जयदीप कांबळे (कार्याध्यक्ष, जलसंपदा कास्ट्राईब कर्मचारी संघटना) व जिल्हा कार्यकारणी सर्व सदस्य यांनीही आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी आणि भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वांनी एकजुटीने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कास्ट्राईब कर्मचारी महासंघ शाखा कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.