Awaj India
Register
Breaking : bolt
शंभर कोटी रस्त्यांची क्वालिटी चेकअप करणार; आ. सतेज पाटीलवरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणात होणार शिक्षकांची " परीक्षा " किमान 50 % गुण प्राप्त न झालेस करावे लागणार पुन्हा प्रशिक्षण अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सामंजशाने सुटेल; आमदार सतेज पाटील..उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा दौरान्यू हायस्कुल देवाळेचा *SSC बोर्ड निकाल 100%*डी. वाय. पाटील विद्यानिकेतनचा दहावी सीबीएसईचा शंभर टक्के निकाल**डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसितगृहात विनामूल्य प्रवेश सुरु*श्री एस एच पी हायस्कूल 100 टक्के निकाल नागपूरमधून सुरू झाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा महाराष्ट्र दौरा*कुरुंदवाड आगाराला ८ नवीन बसेस देवू : ना. प्रतापराव सरनाईक

जाहिरात

 

शंभर कोटी रस्त्यांची क्वालिटी चेकअप करणार; आ. सतेज पाटील

schedule19 May 25 person by visibility 95 categoryराजकीय

*कोल्हापूर:
कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत सुरु असलेल्या राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधील शंभर कोटी रस्त्यांचे पुढच्या आठवड्यात आम्ही क्वालिटी चेकअप करणार आहोत. त्यामुळे या रस्त्यांची सर्व अपूर्ण कामे पूर्ण करून घ्या अशा सूचना विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिल्या. कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत शहरातील महत्वपुर्ण विषय़ांवर, विविध शिष्टमंडळांच्या आणि समाजाच्या प्रश्नांवर आयुक्त तथा प्रशासक के. मजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 
 
       कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील सर्व अधिकाऱ्यांसमवेत ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात आज आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये श्री महालक्ष्मी मार्केट, सरस्वती टॉकीज येथील दुकानदार आणि गाळाधारकांचे प्रश्न, फेरीवाल्या संघटनांचे प्रश्न, लाड-पागे समिती शिफारशीनुसार कामगारांच्या वारसांना वारसा हक्क नियुक्ती, थेट पाईपलाईन योजना, शहरांतर्गत पाणी पुरवठा वितरण व्यवस्था, आरोग्य व स्वच्छता, राज्यस्तरीय नगरोत्थान शंभर कोटी रस्त्यांची कामे, कसबा बावडा येथील शाहू गृह निर्माण संस्था, दत्त मंदीर व संकपाळ नगर झोपडपट्टी संदर्भातील कामे, मान्सूनपूर्व शहरांतर्गत नाले सफाई व कचरा निर्गतीकरण, पॅव्हेलियन मैदान येथील फेन्सींग इमारत कामकाज व मैदान परिसर व्यवस्था स्टाफ, लक्षतिर्थ वसाहत येथील गोसावी समाज दफनभूमीचा ताबा, कसबा बावडा नियोजीत बांधकामामधील स्विमिंग टँकच्या कामांचा आढावा घेवून संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व समस्या त्वरित सोडवाव्यात अशा सूचना केल्या.
 
दरम्यान, थेट पाईपलाईन मध्ये आयसोलेटर बसविण्याबाबत चार महिन्यापूर्वी अधिकाऱ्यांना सूचना देवूनही अद्याप आयसोलेटर बसविणेत आले नाहीत. तसेच शहरांतर्गत असणाऱ्या पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेबाबत आमदार सतेज पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. लाड-पागे समिती शिफारशीनुसार कामगारांच्या वारसांना वारसा हक्क नियुक्तीबाबत शासनाने पत्र देऊनही नियुक्त्या प्रलंबित आहेत त्यांच्या नियुक्त्या कराव्यात, सरस्वती टॉकिज येथील दुकानगाळे संबंधित गाळेधारकांच्या तात्काळ ताब्यात द्यावेत, मान्सूनपूर्व शहरांतर्गत नाले सफाई व कचरा निर्गतीकरण करण्यासाठी एक दिवसाची मोहीम निश्चित करावी. या मोहिमेत शहरातील सर्व शाळा कॉलेज यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घ्यावे, कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत सुरु असलेल्या राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधील शंभर कोटी रस्त्यांचे पुढच्या आठवड्यात आम्ही क्वालिटी चेकअप करणार आहोत. त्यामुळे या रस्त्यांची सर्व अपूर्ण कामं पूर्ण करून घ्या अशा सूचना देखील आमदार सतेज पाटील यानी बैठकीत दिल्या.
 
बैठकीला आयुक्त के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, उज्वला शिंदे, शहर अभिंयता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes