गोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार; पक्षात कोणतीही फूट नाही – मंत्री हसन मुश्रीफ
schedule27 May 26 person by visibility 32 categoryराजकीय
कोल्हापूर आवाज इंडिया प्रतिनिधी
Hasan Mushrif यांनी आज कोल्हापूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील घडामोडी, गोकुळ दूध संघ निवडणूक, राज्यातील साखर उद्योग आणि सीपीआर रुग्णालयातील वाद यांसह विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत पक्षातील सर्व नेते, खासदार आणि आमदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे सांगताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, “पक्षातील हे पेल्यातील वादळ पेल्यातच संपले आहे.” तसेच Praful Patel काही कामानिमित्त बैठकीला अनुपस्थित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षातील नाराजीच्या चर्चेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सुनेत्रावहिनी पवार यांच्या शपथविधीनंतर माध्यमांत त्यांना “व्हिलन” ठरवले जात असल्याची भावना काही नेत्यांनी व्यक्त केली होती. मात्र, संपूर्ण पक्ष एकसंघ असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
राज्यातील अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसला तरी तो लवकरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२०२९ च्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढाव्यात, या Chhagan Bhujbal यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की सर्व पक्ष तयारी करत असतात. मात्र, महायुती एकत्रितपणेच निवडणुका लढवेल.
गोकुळ निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले
Gokul Milk Union निवडणुकीसाठी ठरावांच्या जुळणीवरून निर्माण झालेल्या चर्चेबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले की, “यामध्ये कोणतीही ठिणगी नाही. सर्व परिस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली जाईल आणि अंतिम निर्णय तेच घेतील.”
Satej Patil यांनी “राजर्षी शाहू समविचारी शेतकरी आघाडी” स्थापन करून निवडणुकीची तयारी सुरू केल्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, “त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवणार, जिंकणार आणि चेअरमनही महायुतीचाच करणार हे ठरलेले आहे.”
महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या ठराव, प्रतिनिधी निश्चिती, कच्ची आणि पक्की मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मतदार यादी अंतिम झाल्यानंतरच जागावाटपाचा निर्णय होईल. साधारण सप्टेंबर महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आळा बसल्याचेही त्यांनी सांगितले. “निवडणूक वेळेत घेण्याचे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळेच निवडणूक वेळेवर होत आहे,” असे ते म्हणाले.
सीपीआर रुग्णालयातील वादावर तोडगा काढणार
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College आणि CPR Hospital येथे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या केबिनवरून सुरू असलेल्या वादाबाबतही मंत्री मुश्रीफ यांनी भूमिका स्पष्ट केली.
सीपीआरच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण लवकरच मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. हा विषय आपण आणि पालकमंत्री Prakash Abitkar बसून सोडवू, असे त्यांनी सांगितले.
साखर उद्योग संकटात; केंद्राकडून मदतीची अपेक्षा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज दिल्लीला गेले असून, कांदा उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाच्या अडचणी हे प्रमुख विषय असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
साखर उद्योग गंभीर आर्थिक संकटात असल्याचे सांगताना त्यांनी एका साखर कारखानदाराचे उदाहरण देत परिस्थितीची तीव्रता मांडली. साखरेचे दर वाढविणे, इथेनॉलचे दर वाढवून खरेदी वाढविणे, को-जनरेशनचे दर वाढविणे, सॉफ्ट लोन, रिस्ट्रक्चरिंग आणि व्याजाचा भार केंद्र सरकारने उचलणे अशा मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.