Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात “कॉकरोच जनता पार्टी”ला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; २९ मे रोजी मेळावागोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार; पक्षात कोणतीही फूट नाही – मंत्री हसन मुश्रीफगोकुळ निवडणुकीचे रणांगण तापले; सतेज पाटील यांचे दूध उत्पादकांना आवाहन,कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (KMRDA) १ जून रोजी दसरा चौकात लाक्षणिक उपोषणश्रीमती सरस्वती तुकाराम यादव यांचे निधनजागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृती फाउंडेशनतर्फे “पर्यावरण गौरव पुरस्कार” सोहळ्याचे आयोजनशिक्षकेतर कर्मचारी समायोजन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरेडॉ. शरद गायकवाड प्रबुद्ध इंटरनॅशनल संस्थेचा भिमस्फूर्ती पुरस्काराने सन्मानितडॉ. संजय डी. पाटील यांचा* *‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड' ने सन्मान*कोल्हापूर महापालिकेच्या विशेष सभेत एलईडी पथदिवे प्रकरणी मोठा निर्णय

जाहिरात

 

गोकुळ निवडणुकीचे रणांगण तापले; सतेज पाटील यांचे दूध उत्पादकांना आवाहन,

schedule27 May 26 person by visibility 34 category

 विरोधकांची महायुती एकवटण्याची चर्चा

 कोल्हापूर आवाज इंडिया प्रतिनिधी 
आमदार satej Patil यांच्या नेतृत्वाखालील गोकुळ निवडणुकी संदर्भात दूध उत्पादक व ठराव धारकांना साथ देण्याचे आवाहन केलेले आहे.
 दूध संघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले असून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील सहकार राजकारणाला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्या, राजकीय पत्रके आणि विविध दैनिकांमधील वृत्तांमुळे गोकुळची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.
आमदार सतेज पाटील यांनी नुकतेच एक पत्रक प्रसिद्ध करून ठरावदार, दूध उत्पादक संस्था आणि सभासदांना आवाहन केले आहे. “गोकुळ ही केवळ संस्था नसून शेतकऱ्यांच्या विश्वासाची चळवळ आहे. दूध उत्पादकांच्या हितासाठी समविचारी शक्तींनी एकत्र राहणे गरजेचे आहे,” असा संदेश त्यांनी पत्रकातून दिला आहे.
दरम्यान, गोकुळ निवडणुकीत यंदा मोठी राजकीय आघाडी उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनस्वराज तसेच इतर काही स्थानिक राजकीय गट हे सतेज पाटील यांच्या विरोधात एकत्र येण्याच्या हालचाली करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे, सतेज पाटील यांच्या बाजूने समविचारी गट आणि सहकार क्षेत्रातील काही पारंपरिक समर्थक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या निवडणुकीत गोकुळमध्ये सत्तांतर घडवत सतेज पाटील गटाने मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. गोकुळची आर्थिक उलाढाल, जिल्ह्यातील दूध उत्पादकांवरील प्रभाव आणि ग्रामीण राजकारणातील महत्त्व लक्षात घेता ही निवडणूक केवळ सहकारापुरती मर्यादित न राहता आगामी स्थानिक राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारी ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. 
दरम्यान, मतदार यादी, सभासद पडताळणी आणि काही संस्थांच्या पात्रतेवरून न्यायालयीन प्रक्रिया देखील सुरू असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही काही याचिका फेटाळल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आल्याचे मानले जात आहे. 
गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यातील सहकार, शेतकरी आणि राजकीय ताकदीची खरी परीक्षा लागणार असून येत्या काही दिवसांत आरोप-प्रत्यारोप, बैठका, पत्रके आणि राजकीय रणनीतींमुळे कोल्हापूरचे राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes