चुयेच्या सक्षम नारिंगकर याचा अटकेपार झेंडा
schedule03 Jul 26 person by visibility 63 categoryशैक्षणिक
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश
कोल्हापूर आवाज इंडिया
इयत्ता पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्थान पटकवित गुणवत्तेची परंपरा कायम राखली. इयत्ता आठवी (प्रामीण) गटात भुदरगड तालुक्यातील प. बा. पाटील हायस्कूल (मुदाळ) येथील सक्षम शरद नारिंगकर याने २८६ गुण मिळवत राज्य गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक मिळविला.
सक्षम नारींगकर हा चुये तालुका करवीर येथील असून त्याला वडील शरद व आई रूपाली यांचे मार्गदर्शन मिळाले. रूपाली यांचे शिक्षण एमएड झाले असून त्या महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत आहेत. तर वडील शरद यांचा डेअरी डिप्लोमा डेअरी टेक्नॉलॉजीचे शिक्षण झालेले आहे. ते गोकुळ मध्ये कार्यरत आहेत.