Awaj India
Register
Breaking : bolt
चुयेच्या सक्षम नारिंगकर याचा अटकेपार झेंडा कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूककोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठमहालक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या फेरलेखापरीक्षणाचे आदेश;कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवालशिक्षक नेते एस. व्ही. पाटील सरांचा सेवापूर्ती सदिच्छा व गाडी प्रदान सोहळा कोल्हापुरात रंगणार;

जाहिरात

 

कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती*

schedule03 Jul 26 person by visibility 34 categoryराजकीय

कोल्हापूर: कोल्हापूर वनविभागाच्या मौजे चिखली येथील रोपवाटिकेतील फिंगर जॉईंट मशीन वर्कशॉपसाठी अनुभवी फिंगर जॉईंट मशीनचालक पदाच्या दोन जागांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी 9 जुलैपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग यांनी केले आहे.

या भरतीअंतर्गत दोन पदे भरली जाणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना 11 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा 10 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. नियुक्तीचे मुख्यालय कोल्हापूर असून कार्यक्षेत्र संपूर्ण कोल्हापूर वनविभाग राहणार आहे. उमेदवारांना फिंगर जॉईंट मशीन हाताळण्याचा, सुतारकामाचा तसेच फर्निचर उद्योगातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 25 ते 45 वर्षांदरम्यान असावे.

अर्जदारांनी स्वहस्ताक्षरात किंवा टंकलिखित अर्जामध्ये संपूर्ण नाव, जन्मतारीख, पत्ता, शैक्षणिक पात्रता, अनुभव आदी माहिती नमूद करून 9 जुलै पर्यंत कार्यालयीन वेळेत उपवनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग, "वनवर्धन" इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिससमोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर –416003 येथे सादर करावा. तसेच अर्ज dycfkop2007@gmail.com या ई-मेलवरही पाठविता येईल. ई-मेलद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज प्राप्त झाल्याची खात्री करून घ्यावी.

अर्ज सादर केलेल्या पात्र उमेदवारांच्या 10 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता उपवनसंरक्षक कार्यालयात मुलाखती घेतल्या जाणार आहेत. निवड समितीच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवड करण्यात येईल.

वनविभागाने स्पष्ट केले आहे की ही नियुक्ती पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाची असून नियमित शासकीय सेवेसंबंधी कोणताही हक्क किंवा लाभ उमेदवारांना मिळणार नाही. आवश्यकतेनुसार सेवा समाप्त करण्याचा तसेच भरती प्रक्रिया रद्द अथवा स्थगित करण्याचा अधिकार विभागाने राखून ठेवला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes