Awaj India
Register
Breaking : bolt
चुयेच्या सक्षम नारिंगकर याचा अटकेपार झेंडा कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूककोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठमहालक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या फेरलेखापरीक्षणाचे आदेश;कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवालशिक्षक नेते एस. व्ही. पाटील सरांचा सेवापूर्ती सदिच्छा व गाडी प्रदान सोहळा कोल्हापुरात रंगणार;

जाहिरात

 

भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूक

schedule03 Jul 26 person by visibility 387 categoryशैक्षणिक

कोल्हापूर (आवाज इंडिया)
कोल्हापुरात एका नामांकित शिक्षण संस्थेत मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याकडून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. दहा ते पंधरा तरुणांच्याकडून ऍडव्हान्स म्हणून तब्बल 44 लाख रुपये घेतले आहेत. तीन महिने झाले अद्याप नोकरीची काहीच कारवाई नाही म्हणून संतप्त तरुणांनी मुख्याध्यापिकांच्या विरोधात तक्रार केली आहे.
 शिक्षण महर्षी यांच्या सून असलेल्या या मुख्याध्यापिका यांनी संस्थेत नोकरीला लावतो म्हणून 10 ते 15 तरुणांच्या कडून तीन लाख प्रमाणे पैशाची उचल केली आहे.. मुलींच्या शाळेत हा प्रकार झाला असून एका नामांकित पेठेतील ही प्रसिद्ध शाळा आहे. या संस्थेत जागा भरायच्या आहेत म्हणून मुख्याध्यापिका यांनी विविध भावी शिक्षकांच्या कडून 44 लाख रुपये जमा केलेत.
 तीन महिने झाले अद्याप आपल्याला नोकरी नाही म्हणून हे तरुण चेअरमन यांच्याकडे विचारणा करायला गेले. यावेळी संस्थेत कोणत्याही प्रकारची जागा भरायची नाही असं संबंधितांनी सांगितले. यावर या भावी शिक्षकांना चांगलाच धक्का बसला.
 काही तरुणांनी चेअरमन यांच्याकडे मुख्याध्यापिका यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. असा प्रकार झाल्याने चेअरमन यांना सुद्धा धक्का बसलेला आहे. संबंधित मुख्याध्यापिका यांना प्रकरण काय आहे अशी विचारणा करण्यात आली आहे. मुख्याध्यापिका यांच्याकडून मिटवा मिटवी करण्याची तयारी सुरू केली आहे. अद्याप कारवाई कोणतीही झाली नसल्याने चेअरमन यांच्याबाबत ही शंका उपस्थित केली जात आहे.
 विद्यार्थ्यांना धडा शिकवायला इच्छुक असलेल्या भावी शिक्षकांना मुख्याध्यापिका यांनी चांगलाच धडा शिकवल्याने नोकरीचा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.
 या मुख्याध्यापिका ज्या विषयाच्या तज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे त्या विषयाच्या त्या पदवीधर नाहीत तरीही शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून त्यांची चौकशी का होत नाही असाही प्रश्न काही शिक्षक विचारत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes